नाशिक – कोरोना चाचणी अहवालावरुन खासगी लॅब दातार कॅन्सर जेनेटिक्सला चाचण्या बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर दातार लॅबनेही कायदेशीर लढाईसाठी जय्यत तयारी केली आहे. यासाठीच दातार लॅबने राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांना चार पानी नोटिस पाठवली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे दातार कॅन्सर जेनेटिक्सची मोठी बदनामी झाली असून प्राथमिकतः कंपनीची ५०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. ही हानी तुम्ही स्वतः किंवा सरकारने भरुन द्यावी, असा दावा दातार लॅबने केला आहे. तसेच या नोटिसीत दातार लॅबने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील अनेक बाबींचा अतिशय गांभिर्याने समाचार घेतला आहे.
ज्या नमुन्यांवरुन संशय आहे ते मानवाचे आहेत की प्राण्यांचे असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रात उल्लेख केला आहे. त्यावर दातार लॅबने प्रश्न निर्माण केला आहे की, भारतात प्राण्यांना आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आहेत, याची माहितीच पहिल्यांदा समोर येत आहे. तसेच, प्राण्यांनाही भारतात कोरोना झाला आहे का, याचा खुलासाही आताच होत असल्याचे म्हटले आहे. चार पानी या पत्रात अतिशय सविस्तरपणे दातार लॅबने उत्तर दिले असून कायदेशीर तयारीही भक्कम केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पुढील काळात दातार लॅब विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दातार लॅबने दिलेली नोटिस अशी