महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ध्वजवंदन केले. याप्रसंगी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना विद्यापीठातर्फे कुलगुरुंनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यापीठ आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. यावेळी कोव्हिड १९ संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.
—
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)
निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी ध्वजारोहण केले. ध्वजपूजन माजी नौदल अधिकारी व उद्योजक राम कृष्ण त्रिखा यांनी केले. संचालन उद्योजक दिलीप पिंगळे यांनी केले. मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निमाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात व एकूणच शहराच्या वाटचालीबाबत उपस्थितांना जाधव यांनी अवगत केले. निमा या संस्थेचा सध्या निर्माण झालेला तिढा सनदशीर मार्गाने सोडवावा, असे उपस्थितांनी सूचविले. उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार कैलास आहेर, प्रदीप पेशकर, संजय महाजन, उदय रकिबे, बाळासाहेब गुंजाळ, गौरव धारकर, संदीप भदाणे, रावसाहेब रकिबे, एन डी ठाकरे आदींची उपस्थिती होती.
—
नांदगाव – मविप्र संस्थेच्या महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन संपन्न
नांदगाव – येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सभासद वाल्मिक पाटील यांच्याहस्ते ७४ वा स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सर्जेराव पाटील,उपप्राचार्य प्रा.संजय मराठे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.रविंद्र देवरे, प्रा.सुरेश नारायणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सागर कडलग यांनी केले. यावेळी पल्लवी गुढेकर, नैना पगारे, रूपाली भालेकर, दर्शना चोपडा, रितीका मोरे, संस्कृती तोरणे यांनी ध्वजगीत व राष्ट्रगीत म्हटले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
–