नाशिक – जिल्हयात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तब्बल ६ हजार ८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये ४ चार ९३ हेक्टरवरील बागायती तर १ हजार ९४२ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिके जमीनदोस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक जिल्ह्यातील २८२ गावातील जवळपास १० हजार १७० शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांचे द्राक्ष, कांदा, गहू, मका, ऊस, पेरू, डाळिंब, हरभरा ही पिकं पूर्णपणे आडवी झाली आहे. तर उन्हाळ कांद्याची रोपेही पूर्णपणे नष्ट झाली.
नाशिक जिल्ह्याला बसलेला तडाखा
(प्राथमिक अंदाज )
कांदा – ३३४४ हेक्टर
द्राक्ष – १९३० हेक्टर
गहू – ५०९हेक्टर
हरभरा – १२६ हेक्टर
भाजीपाला – ११४ हेक्टर
डाळिंब – ११ हेक्टर
अन्य फळे – ५३
एकूण – ६०८९ हेक्टर