ठाणे – कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असून, पुन्हा चिंता वाढलेली आहे. सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात मुंब्रा-कळवा मतदारसंघातचे आमदार आणि राज्य सरकारमधले गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे.
मुंब्रा इथं झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी विधान केलं आहे. कोरोना येणार आहे हे अल्लाला २०११ मध्येच समजले होतं. त्यामुळेच मुंब्र्यात जमीन मिळाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थान बांधून पूर्ण झाले असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
श्री. आव्हाड म्हणाले, की कोरोनाकाळात आपल्याकडे हे कब्रस्थान नसते, तर शहराची काय परिस्थिती असती याची कल्पना करवत नाही. याचा विचार अल्लानं २०११ रोजी करून ठेवला होता की २०२० मध्ये कोरोना येणार आहे. कोरोना येण्यापूर्वी इथं कब्रस्थान बनले पाहिजे. आव्हाड यांच्या या विधानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.