नवी दिल्ली – भारतामध्ये डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या रिलायन्स जीओचे महाराष्ट्रातील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून 3.55 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडून जिओ महाराष्ट्रातील नं. 1 चा टेलिकॉम ऑपरेटर बनला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे फक्त साडेचार वर्षात जिओचा कष्टमर मार्केट शेअर 38.15 % वर पोहोचला असून क्रमांक 2 वर असलेल्या वी अर्थात व्होडा आयडिया चा एकत्रित मार्केट शेअर 35.22 % असून त्यांची ग्राहकसंख्या 3.28 कोटी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एअरटेल कडे 1.79 कोटी ग्राहक असून त्यांचा मार्केट शेअर 19.20 कोटी आहे.
ट्राय अर्थात टेलिकॉम रेगुलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया तर्फे प्रसिद्ध केलेल्या डिसेंबर 2020 च्या आकडेवारीनुसार जीओचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध होते. सप्टेंबर 2016 मध्ये दमदार पदार्पण केलेल्या जीओने अल्पावधीतच आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध करून गेली अनेक वर्षे बाजारात असलेल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याना धोबीपछाड दिली.
ग्रॉस रेव्हेन्यू मध्ये जिओने यापूर्वीच बाजी मारली असून सर्व प्रतिस्पर्ध्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. रेव्हेन्यू मार्केट शेअरमध्ये जिओचा वाटा तब्बल 39.20 % इतका आहे तर व्होडा आयडिया चा 29.89% आहे.
मागील संपूर्ण तिमाहिमध्ये फक्त जिओ आणि एअरटेल कडून ग्राहकांची भर नोंदविण्यात आली तर बाकी सर्व टेलिकॉम ऑपरेटरला ग्राहकसंख्या गमावण्याची वेळ आली.
डेटा वापरामध्ये देखील जिओचा डंका असून जिओच्या नेटवर्कवर तब्बल 15 हजार टेराबाईट एवढा डेटा वापरला जातो जो प्रतिस्पर्धी ऑपरेटर पेक्षा 60 % अधिक आहे. थोडक्यात डेटा मार्केट शेअर मध्येही जिओच अव्वल नंबर आहे. जिओच्या दमदार नेटवर्क चा यामद्धे सिंहाचा वाटा असून अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये देखील जीओचे नेटवर्क सुरळीत कार्यरत होते
कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्यादित कॉलिंग ,100% संपूर्ण 4G नेटवर्क सर्व सामान्यांना परवडणारे डेटा दर हे जिओच्या यशाचे गमक आहे. नुकतीच जिओ च्या वतीने जिओफोन ऑफर सादर केली असून यामध्ये ग्राहकांना 1999 मध्ये जिओफोन सह 2 वर्षासाठी मोफत अमर्यादित कॉलिंग मिळणार आहे. अजूनही 2G मद्धे अडकून पडलेल्या मोठ्या ग्राहकवर्गाला यामुळे 4G वापरता येणार आहे.