मुंबई – ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 च्या यादीमध्ये प्रथमच समाविष्ट झालेल्या रिलायन्स जिओने जोरदार मुसंडी मारत 5 वा क्रमांक मिळविला आहे. ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 च्या यादीमध्ये जगातील सर्वात मजबूत ब्रॅण्ड्स ची रँकिंग केली जाते. रिलायन्स जिओने अँपल ,ऍमेझॉन अलिबाबा आणि पेप्सी यासारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. रिलायन्स जिओ हे जगातील सर्वात पहिल्या 10 ब्रँडमधील एकमेव भारतीय ब्रँड आहे. ब्रँड सामर्थ्याच्या बाबतीत, रिलायन्स जिओने 100 पैकी 91.7 ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (बीएसआय) गुण मिळविला आहे आणि एएए + रँकिंग मिळविली आहे.
या व्यतिरिक्त, अहवालात म्हटले आहे की दूरसंचार क्षेत्रातील ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत जिओ हा सर्वात वेगवान विकसनशील ब्रँड आहे, जिथे संपूर्ण उद्योगात नकारात्मक वाढ दिसून येत आहे तर जिओचे ब्रँड व्हॅल्यू वाढून 4.8 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.
2016 मध्ये जिओने भारतीय दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. आज रिलायन्स जिओ 400 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांसह भारतातील सर्वात मोठा आणि जगातील तिसरा सर्वात मोठा मोबाइल नेटवर्क ऑपरेटर बनला आहे. अहवालात म्हटले आहे की जिओने भारतीय बाजारातील कोट्यावधी ग्राहकांना परवडणारे 4 जी नेटवर्क दिले आहे. जिओने डेटा वापरण्याची भारतीयांची सवय पूर्णपणे बदलली. भारतीय ग्राहकांच्या डेटा वापराच्या क्रांतिकारक बदलाला “जिओ इफेक्ट” असे म्हणतात.
कल्पनांचे अचूक रूपांतरण, ब्रँड प्रतिष्ठा, ब्रँड शिफारस, इनोव्हेशन, ग्राहक सेवा आणि अर्थव्यवस्था यासारख्या सर्व बाबींवर जिओने आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगले गुण मिळवले आहेत. रिलायन्स जिओ ब्रँडमध्ये कोणतीही कमतरता किंवा कमकुवतपणा नसल्याचे अहवालात म्हटले आहे. जिओने जागतिक पातळीवर अनेक परिपाठ मोडली आहेत आणि ग्राहकांकडून त्याचे पूर्ण समर्थन मिळत आहे.
ब्रँड फायनान्सने घोषित केलेला सर्वात मजबूत ब्रँड म्हणजे वी चॅट, ज्याचा 100 पैकी 95.4 गुणांचा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (बीएसआय) आहे. ऑटो दिग्गज फेरारीने दुसरे स्थान मिळविले, रशियन बँक सेबर आणि कोका कोला जगातील तिसरे आणि चौथे क्रमांकाचे ब्रँड आहेत.









