नवी दिल्ली : वेगवेगळ्या प्लॅन्स अंतर्गत जास्तीत जास्त डेटा आणि अन्य सुविधा देऊन मोबाइल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. एकप्रकारे त्यांची स्पर्धाच सुरू असते. जिओ आणि एअरटेलमध्ये सध्या अशीच स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कंपन्यांचा एकाच किंमतीचा एक प्लॅन आहे. यात ते ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत.
जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला ३ जीबी डेटा मिळतो आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस आहे. म्हणजेच जवळपास महिन्याला तुम्हाला ८४ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवााय अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० मेसेज या सुविधाही आहेतच. तसेच जिओ सिनेमासह अन्य जिओ ऍप्सचा मोफत ऍक्सेस मिळेल.
एअरटेलच्या ३४९ च्या प्लॅनमध्ये दिवसाला २ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. याशिवाय दिवसाला १०० मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंग आहेच. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस आहे. या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यासोबत अमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनच्या व्हॅलिडीटीपर्यंत ही सुविधा मिळेल. याशिवाय एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, विंक म्युझिक तसेच १ वर्षाच्या वॉरंटीसह शॉ अकॅडमीचा फ्री ऑनलाइन कोर्स, आणि फास्ट टॅग घेतल्यास १०० रुपयांची कॅशबॅक अशा ऑफर्स आहेत.
या दोन्ही प्लॅन्सची जर तुम्ही तुलना केलीत तर किंमत वगळता या प्लॅन्समध्ये काही सारखेपणा नाही. जिओच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा मिळणार आहे तर एअरटेलमध्ये २ जीबी. प्लॅन अंतर्गत मिळणाऱ्या अन्य सुविधांचा विचार केला तर कदाचित एअरटेल सरस ठरेल. कारण १२९ ची महिन्याची अमेझॉन प्राईमची मेम्बरशीप यात मोफत मिळते आहे. पण जर तुम्ही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असाल, तर जिओचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे.