नवी दिल्ली – रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने आतापर्यंत अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड योजना बाजारात आणल्या आहेत. त्यात मोबाईल ग्राहकांना डेटासह अमर्यादित कॉलिंगसह इतर अनेक फायदे दिले जात आहेत. आता कंपनीच्या वतीने ग्राहकांसाठी सर्वात लोकप्रिय 349 रुपये किंमतीचा ट्रेडिंग प्लॅन देखील आणण्यात आला आहे.
रिलायन्स जिओच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रीपेड योजनेअंतर्गत मोबाईल वापरकर्ते अनेक फायदे घेऊ शकतात. रिलायन्स जिओच्या ३४९ रुपयांच्या प्रीपेड योजनेबद्दल माहिती जाणून घेऊ या…
योजना २८ दिवसांच्या वैधतेसह
रिलायन्स जिओच्या लोकप्रिय ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ही व्हॅलिडिटी (वैधता) २८ दिवसांसह येते. कंपनीच्या वेबसाइटवर ३४९ रुपयांच्या योजनेचे वर्णन ट्रेंडिंग प्लॅन असे केले आहे. म्हणजेच, मोबाईल वापरकर्त्यांमध्ये याचा चांगला ट्रेंड आहे.
यात ३ जीबी डेटा उपलब्ध
या प्रीपेड योजनेत ३४९ रुपयांच्या वापरकर्त्यांना या योजनेत दररोज ३ GB जीबी डेटाचा लाभ मिळेल, तो २८ दिवसांच्या वैधतेसह येईल. म्हणजेच काही वैधतेच्या दरम्यान वापरकर्त्यांना एकूण ८४ GB डेटा मिळू शकतो.
इतर आणखी फायदे
३४९ रुपयांचा रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅन खरेदी करायचा असेल तर या प्लॅनमध्ये अनेक फायदेही मिळतील. या योजनेनुसार आपण २८ दिवसांच्या वैधते दरम्यान अमर्यादित कॉलिंगची सुविधा घेऊ शकता. तसेच दररोज १०० एसएमएस उपलब्ध असतील. याशिवाय प्लॅनमध्ये यूजर्सला जियो अॅप्सची फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजेच, आपल्याला Jio अॅप्स वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नाही. यात JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud यांचा समावेश आहे.