नवी दिल्ली – रिलायन्स जिओने 5G तयारी सुरु केली असून त्याकरिता सर्व २२ मंडळांसाठी स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. ज्याचे मूल्य ५७ हजार १२३ कोटी रुपये आहे. या खरेदीनंतर रिलायन्स जिओकडे एकूण १७१७ मेगा हर्ट्ज असेल, पूर्वीच्या तुलनेत ते ५५ टक्के जास्त आहे.
रिलायन्स जिओने अलीकडेच जाहीर केले की, त्यांनी स्वदेशी 5G तंत्रज्ञान विकसित केले असून त्याची क्वालकॉमच्या मदतीने अमेरिकेत चाचणी घेण्यात आली आहे. दुसरीकडे, एअरटेलची 5G सेवा देखील सज्ज असून त्याची व्यावसायिक चाचणी हैदराबादमध्ये आधीच झाली आहे.
स्पेक्ट्रम लिलावादरम्यान एअरटेलने रेडिओवेव्हसाठी १८ हजार ६९९ कोटी रुपयांची बोलीही लावली असूून यामुळे कंपनीला येत्या काळात 5G सेवा प्रदान करण्यास मदत होईल.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनीही यंदा 5G बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीची 5 जी इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार असून कंपनी फक्त 5G रोलआउट करण्यासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. असाच दावा एअरटेलनेही केला आहे.
केंद्र सरकारच्या मते, जगात सर्वात वेगवान तंत्रज्ञानाने भारतात 5G सेवा सुरू केली जाईल, जी पूर्णपणे स्वदेशी असेल. भारतातील टेलिकॉम स्पेक्ट्रमचा पहिला लिलाव ७७ हजार ८१४ कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमच्या खरेदीसह संपला असून तो मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने विकत घेतला. जिओकडे सरासरी १५.५ वर्षे पुरेल इतके स्पेक्ट्रम उपलब्ध आहे.