मुंबई – भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने सध्या देशातील मोबाईल युझर्सच्या संख्येवर वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सातत्याने नवनव्या आफर्स कंपनी लॉन्च करीत असते. आता आणखी एक धमाकेदार आफर कंपनीने आणली आहे. ही आफर 2जी मुक्त भारत अभियानांतर्गत लॉन्च करण्यात आली आहे. यात जिओ फोन खरेदी करण्यासाठी केवळ 1 हजार 999 रुपये द्यावे लागतील. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाही मिळणार आहे.
1 हजार 999 रुपयांत मिळेत नवा जिओ फोन
रिलायन्स जिओ ने युझर्ससाठी खास आफरची घोषणा करताना सांगितले आहे की नवा फोन घेण्यासाठी केवळ 1 हजार 999 रुपयेच द्यावे लागतील. त्यासोबत 2 वर्षांपर्यंतचे अनलिमिटेड कॉलिंग आणि दरमहा 2 जीबी डेटाही ग्राहकांना मिळणार आहे. याच बंडलच्या दुसऱ्या प्लानमध्ये 1 हजार 499 रुपयांचा जिओ फोन आहे. त्यात एक वर्ष अनलिमिटेड कॉलिंग आणि दरमहा 2जीबी डेटा मिळणार आहे.
रिलायन्स जिओ ने आपली नवी आफर घोषित करताना जिओ फोनच्या विद्यमान युझर्सचाही विचार केला आहे. कंपनीने म्हटले आहे की जिओ फोनच्या ग्राहकांनी एकसाथ 750 रुपये भरल्यास त्यांना एक वर्षापर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाचीही सुविधा मिळेल. 1 मार्चपासून ही आफर लागू झालेली असेल.