दिंडोरी – पंढरपूर येथे सायकल यात्रेस गेलेल्या जानोरी येथील २४ सायकलिस्ट यांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. जानोरी येथे झपाट्याने संसर्ग वाढून गेल्या दोन दिवसात एकूण बाधितांची संख्या तब्बल ४१ झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जानोरी येथील २४ नागरिक सायकल रॅली निमित्त पंढरपूर येथे गेले होते. तिथून आल्यानंतर हे सर्व इसम कोरोना संसर्गित झाल्याने गावात अनेक व्यक्ती बाधित झाल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने जानोरी गाव दोन दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात दर शुक्रवारी होणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. अनावश्यक गावाबाहेर जाऊ नये. मास्क नियमित वापरावे शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना बाधित व्यक्तींना खासगी दवाखान्यात व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
—
नागरिकांनी दूरचा प्रवास टाळला पाहिजे. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित अंतर व मास्कचा वापर करावा.
– डॉ सुजित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी