नवी दिल्ली/मुंबई – कोरोना व्हायरस मुळे सर्वाधिक वाईट पद्धतीने जर कोणती गोष्ट प्रभावित झाली असेल तर ती म्हणजे शाळा आणि महाविद्यालये. मधल्या काळात तर असे वाटत होते की यावर्षी काही शाळा महाविद्यालये सुरु होणार नाहीत. मात्र नंतरच्या काळात कोरोना स संक्रमणात कमी झाल्यामुळे काही राज्यांतील राज्य शासनांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. तर काही राज्ये शाळा सुरु करण्याचा विचार करीत आहेत.
येथे शाळा सुरू
अनलॉकनंतर जी राज्ये शाळा महाविद्यालयांना सुरु करण्यास तयार झाली त्यांच्यामध्ये झारखंड, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा यांचा समावेश आहे. या राज्यांतील शाळा नियमित पद्धतीने सुरु झाल्या आहेत. फक्त विद्यार्थी आणि शिक्षकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जाणून धेऊ या कुठल्या राज्यात काय स्थिती आहे…
कर्नाटक
कर्नाटक राज्यात १ जानेवारी २०२१ पासून १०वि आणि १२वि चे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. कर्नाटक मध्ये याआधीदेखील एकदा शाळा सुरु करण्याचा प्रयोग केला गेला होता. १७ नोव्हेंबर पासून कर्नाटकात स्नातक महाविद्यालये आणि अभियांत्रिकी जानेवारीपासून या राज्यात सुरू होणार शाळा, कॉलेज सुरु करण्यात आली होती मात्र नंतर त्यांना बंद करण्यात आले.
महाराष्ट्रातही नवीन वर्षात ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच शाळा सुरू झाल्या आहेत. आता उर्वरीत जिल्ह्यात शाळा सुरू होणार आहेत.
हरियाणा शिक्षण विभागाने नववी आणि दहावीचे वर्ग २१ डिसेंबर पासून सुरु करण्याचे ठरविले आहे. मात्र येथील सरकारने विद्यार्थ्यांनासुद्धा मेडिकल सर्टिफिकेट आणणे आवश्यक केले आहे.
आसामचे आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी घोषणा केली आहे की येथील शाळा महाविद्यालये १ जानेवारीपासून सुरु होतील. कुठलेही प्रतिबंध असणार नाहीत.
झारखंडमध्ये फक्त दहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येतील. याशिवाय सरकारी ट्रेनिंग संस्थान, डेंटल कॉलेज, नर्सिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे.
उच्च शिक्षण संस्थान १ जानेवारी पासून सुरु करण्यास मध्य प्रदेश शासनाने परवानगी दिली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा येथे डिसेंबर मध्येच सुरु करण्यात आल्या आहेत.