नवी दिल्ली – बँकांचे व्यवहार कितीही ऑनलाइन झाले असले, तरी काही न काही कारणासाठी आपल्याला बँकांमध्ये जावेच लागते. आपण वेळ काढून बँकेत जावे आणि नेमकीच बँकेला सुटी असेल तर मग आपली चिडचिड होते. हे टळावे म्हणून जानेवारी २०२१ मध्ये बँका कधी बंद असतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यातील काही सुट्ट्यांशी आपल्याकडील बँकांचा काही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला काळजीचे फार कारण नाही.
जानेवारी महिन्यात जवळपास १६ दिवस बँकांना सुटी असेल. यात पाचही रविवार आणि दुसऱ्या, चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. याशिवायच्या बँकेच्या सुट्या अशा असतील.
१ जानेवारी – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेघालय, मणिपूर, सिक्कीम, तामिळनाडू आणि मिझोराम येथील बँकांना सुट्टी असेल.
२ जानेवारी – नवीन वर्षानिमित्त मिझोराममधील बँका बंद असतील.
९ जानेवारी – दुसऱ्या शनिवारनिमित्त बँका बंद राहतील.
१२ जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधील बँका बंद असतील.
१४ जानेवारी – मकर संक्रांतीसाठी गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहतील.
१५ जानेवारी – माघ बिहुनिमित्त तामिळनाडू आणि आसाममध्ये बँकांना सुट्टी.
१६ जानेवारी – उछावर थिरूनलनिमित्त तामिळनाडूत सुट्टी.
२० जानेवारी – गुरू गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंजाबमध्ये बँका बंद.
२५ जानेवारी – इमोईनु इरात्पा निमित्त माणिपूरमध्ये बँका बंद.
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
(बँकांच्या सुट्ट्यांची ही यादी आरबीआयच्या संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.)