नाशिक – सातपूरच्या जाधव संकुल परिसरात रस्त्याने चालत घराकडे येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४६ हजाराची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर चोरटे फरार झाले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलावती नामदेव काठे (रा. जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार काठे या २७ ऑगस्टला दुपारी घराकडे येत होत्या. त्याचवेळी रस्ता ओलांडत असताना समोरून काळ्या रंगाची दुचाकी जवळ आली. अचानक त्यांनी काठे यांच्या गळ्यातील २ तोळ्याची ओम पान असलेली सानसाखळी हिसकावली. या झटापटीत अर्धी पोत तुटून त्यांच्या हातात आली. तर उर्वरीत दीड तोळ्याची चैन घेऊन संशयितांनी पळ काढला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक पाटील करीत आहेत.