घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल
नाशिक – पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतल्यानंतर जातपंचायतीने न्यायनिवाडा करण्यासाठी या महिलेला उकळत्या तेलात हात घालण्याचे सांगितले. या महिलेने विरोध करूनही पतीने तीचे चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली. या विचित्र न्यायनिवाड्यात महिलेचा हात भाजला…या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल होत असून सर्वत्र या घटनेचा निषेध केला जात आहे. हा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान या घटनेची चौकशी होऊन जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. असे न्यायनिवाडे अंधश्रद्धेवर अधारित असून अवैज्ञानिक आहे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडे या घटनेचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
विचित्र न्यायनिवाडा
पारधी समजाच्या जात पंचायतीत चारित्र्याच्या संशय असला तर महिलेला उकळत्या तेलातुन नाणे बाहेर काढण्याचे सांगितले जाते. या तेलात हाथ भाजला नाही तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते. व हात भाजला तर चारित्र्य यशुद्ध नाही, असे समजले जाते. हा विचित्र न्यायनिवाडा करतांना सदर महिलेच्या पतीने तीन दगडांची चुल मांडली. सरपण लावून चुल पेटवली. चुलीवर तेल टाकलेली कढई ठेवली. तेलाला उकळी आल्यावर नव-याने पाच रूपयांचे नाणे त्या तेलात टाकले. व ते नाणे रिकाम्या हाताने बाहेर काढण्यास सांगितले. त्यात तीचा हात भाजला.
https://www.facebook.com/100022806083090/posts/911284669641727/