नवी दिल्ली – कोरोना काळात घरातच राहून तुम्ही जाड झाला आहात? वजन वाढले आहे, तर मग काळी द्राक्षे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसं तर द्राक्ष लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. यातील काळी द्राक्षे ही तब्येतीसाठी उत्तम असतात. यात ग्लुकोज, मॅग्नीशिअम आणि सायट्रिक ऍसिड यासारख्या घातक गोष्टी असतात. याच काळ्या द्राक्षांमधील अनेक बाबी आज आपण जाणून घेणार आहोत…
-
काळ्या द्राक्षांमधील अँटी ऑक्सिडंट हृदयविकार किंवा रक्त घट्ट होणे अशा कामी येते.
-
काळे द्राक्ष कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते. याशिवायही काळ्या द्राक्षांचे अनेक फायदे आहेत.
-
स्मरणशक्ती वाढवते : काळी द्राक्षे खाल्ल्याने स्मरणशक्ती उत्तम होते.
-
रक्तातील इन्शुलीन वाढवण्यासाठी या द्राक्षांचा उपयोग होतो.
-
या द्राक्षांमधील सायटोकेमिकल्स हा घटक हृदयाची काळजी घेतो.
-
केसांसाठी उत्तम : जर तुमचे केस गळत असतील, केसात कोंडा असेल किंवा केस पांढरे असतील तर काळ्या द्राक्षांचा निश्चितच फायदा होतो. द्राक्षातील ई व्हिटॅमिन केसांची काळजी घेते.