नाशिक – देशभरात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून युवकांना रोजगाराची नितांत गरज आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागे व्हावे आणि रोजगार द्यावा, अशा घोषणा देत युवक काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. एमजी रोड येथील काँग्रेस कमिटीबाहेर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणा बाजी केली. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.