जळगाव – शाकाहाराचे प्रणेते, गोसेवक रतनलाल सी. बाफणा ( ८६)यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. आर.सी. बाफणा ज्वेलर्सचे ते सर्वेसर्वा होते. त्यांच्या निधनामुळे जळगावमध्ये शोककळा पसरली आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक सेवेत त्यांनी मोठे काम केले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात. दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ते राजस्थानमधील भोापलगड येथून जळगावला आले. येथे त्यांनी सुरुवातीला राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे १९ वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांनी १९७४ मध्ये नोकरीला रामराम करुन आर.सी.बाफणा ज्वेलर्सची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असा होता. स्व. बाफणा यांच्यावर सायंकाळी ५.३० वाजता कुसुबा गोशाळा येथे अंत्यसंस्कार होणार आहे.