जळगाव – भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यात म्हटले आहे की, दोन दिवसापूर्वी ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॅाक्टरांच्या सल्लानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॅार्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे.