जळगाव – जळगाव महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी मतदानाला ऑनलाईन पध्दतीने सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या या महानगरपालिकेत ३१ नगरसेवकांनी बंड केल्यामुळे ही निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महानगरपालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक आहे. तर शिवसेनेकडे १५ संख्याबळ आहे. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे.
या निवडणुकीत मदानाआधी भाजपच्या नगरसेविका अॅड. सुचिता हाडा यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतला. पण, पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आक्षेप फेटाळून लावले. महापौरपदासाठी शिवसेनेचे जयश्री महाजन तर भाजपतर्फे महापौर पदासाठी प्रतिभा कापसे यांचे अर्ज वैध ठरले आहे.
या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निकालाआधीच बॅनर
मनपाच्या मुख्यव्दाराजवळच निकालाआधी शिवसेना कार्यकर्ते विराज कावडिया यांनी जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या निवडीचे फलक लावले आहे.