जळगाव – भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को – अॅाप क्रेडिय सोसायटी (बीएचआर ) या संस्थेवर असलेल्या प्रशासक व त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकले. १३५ जणांचे पथक हे पुण्याहून दाखल झाले असून ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. बीएचआर संस्थेता अवसायानात गेली आहे. त्यावर प्रशासक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यांच्या एकुण कारभारबाबत तक्रारी झाल्यानंतर हे छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. अपहार, गुंतवणूकदारांची थकीत न देणे व संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे याबाबत चौकशी केली जात आहे. सकाळी सात वाजता हे पथक जळगावमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी चौकशी सुरु केली. अशाच प्रकारे अौरंगाबाद येथेही चौकशी सुरु असल्याचे बोलले जात आहे.