आज दुपारी मुक्ताईनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपण गेल्या ४० वर्षांपासून पक्षाचे काम केले. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये पक्षाला वाढवण्याचे काम केले. पक्षाने सुद्धा मला बरेच काही दिले. आपल्या पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही. आपण नेतृत्वावर कधीही टीका केली नाही. याच वेळेस आपण केंद्रीय नेतृत्वाविषयी नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी चाळीस वर्षात आम्ही अनेकदा अपमान सहन केले. अनेक अडचणीवर मात केली. मला सांगितले जाते की, पक्षाने खूप काही दिले. पण पक्षाने काही दिले असले, तरी यासाठी आम्ही केलेल्या त्यात सुद्धा मोठा होता, असे खडसे म्हणाले.