दिलीप तिवारी
…..
हे सारे अद्भूत आहे. दुर्लक्षित सत्ता उलथवून टाकायला एकत्र आलेले सामान्य सरदार एकत्र बसून आज (दि.१८) संभाव्य विजयाचा आनंद आजच घेत आहे. गंमत म्हणजे, या कुरुक्षेत्रात स्वतः आलेले सर्व सरदार मोकळे आहेत. सरदारांचे ताबेदार सुद्धा मोकळे आहेत. कोणीही कोणाला डांबून ठेवलेले नाही. एकेकाशी बोलताना लक्षात आले की, हे सारे फक्त आणि फक्त एक राजवट उलथवून टाकायला उत्सुक आहेत. कोणीही कोणावर मेहरबान नाही. *’यहा हम सब एक है. सब का मालिक एक है’ …असा संदेश या नगरसेवकांनी दिला.आता प्रतिक्षा आहे ती निकालाची…..मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे….
भाजपने इगतपुरीत डांबून ठेवलेल्या नगरसेविकेच्या संदर्भातील दोन बातम्या काल सोशल मीडियात गाजल्या. पहिली म्हणजे, पतीने पत्नीला ताब्यात घेण्यासाठी इगतपुरीजवळ तनिष्क रिसोर्ट येथे गोंधळ घातला. त्यानंतर त्या पती महोदयांच्या पत्नीला भाजपने नाशिक येथे पाठवले. मात्र काल सायंकाळी जळगावहून बातमी आली की त्या पतीने पत्नी बेपत्ताची तक्रार जळगाव पोलिसात केली. या दोन बातम्यांच्या पार्श्वभूमी इकडच्या battle ground वर वातावरण पूर्णतः मोकळे ढाकळे आहे.
मुख्यमंत्री, शिंदे व राऊत यांचे आम्हाला पाठबळ
battle ground वर नऊग्रह मंडळातील सर्व सदस्यांची भेट झाली. मनपातील दुर्लक्षित राजवट संपवायचीच हा निर्धार आम्ही शिरसाळे महादेव मंदिरात एकत्र येऊन आणि हातावर हात ठेऊन व्यक्त केला असे सर्वांनी सांगितले. या सर्व नगरसेवकांचे एकच म्हणणे आहे, ‘आम्ही भाजपवर नाराज नाही. आम्ही इतरांवर नाराज नाही पण आम्हाला जळगाव शहर आमदारांनी जी वागणूक दिली त्यावर आम्ही नाराज आहोत.’
हे नगरसेवक एकत्रितपणे म्हणतात, ‘मनपाच्या माध्यमातून विकास कामे होत नव्हती पण तक्रार केली तर आमदार म्हणाले. मी २ वेळा आमदार झालो. तुम्ही पुढे नगरसेवक व्हाल की नाही ते तुमचे तुम्ही पाहा. मग आम्ही शिरसाळे येथे जाऊन शपथ घेतली.’
मनपातील दुर्लक्षित सत्ता उलथवायचीच याच उद्देशाने नवग्रह मंडळ स्थापन झाले. ही नाराज मंडळी प्रथम गजानन मालपूरे व सुनील महाजन यांच्या संपर्कात आली. विलास पालकर, खासदार विनायक राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धीर दिला. मधल्यावेळेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, नीतीन लढ्ढा, एकनाथराव खडसे यांनीही लक्ष घातले. त्यामुळेच ९ जणांची संख्या २७ पर्यंत पोहचली. आज तोच चमत्कार आॕनलाईन मतदानात दिसेल.
दोन दिवस जळगाव मनपासाठी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट झाली. जळगाव संदर्भात तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल असे सांगितल्यावर ते म्हणाले, *’मनपातील दोन ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांना दर आठवड्यात २ दिवस मंत्रायलात बोलावणार आणि प्रत्येक विभागातील विकास कामांचा पाठ पुरावा करणार’.
बस्स आता प्रतिक्षा निकालाची