महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका येथे दौऱ्यावर आले होते. सदर दौऱ्याप्रसंगी नाशिक लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीमधील शपथपत्रातील आश्वासनांवर कार्यवाही करण्याची जलसंपदा मंत्र्यांना विनंती केली. या शपथपत्रामध्ये इगतपुरी, त्रंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक ग्रामीण मधील पाण्याचे आणि सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध जलसिंचन प्रकल्प राबविण्याबाबत आश्वासन देण्यात आलेले होते.
सदर प्रलंबित प्रकल्पांबाबत पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन सदर प्रकल्पांबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पाटील यांनी समीर भुजबळ यांना यावेळेस दिले. यावेळीआमदार हिरामण खोसकर, जयंतराव जाधव, रंजन ठाकरे, संदिप गुळवे, कोंडाजीमामा आव्हाड, दिलीप खैरे व जलसंपदा विभागाचे अधिकारी यावेळेस उपस्थित होते.