मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते खान्देश दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत विविध बैठका घेतल्या. आणि आता त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1362243032330899457