नाशिक – दमणगंगा खोऱ्यातून गुजरातला वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडील नद्यांमध्ये वळविण्याच्या योजनांना आगामी काळात चालना मिळण्याची चिन्हे आहेत. यासाठीच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटीलहे पेठ, सुरगाणा तालुक्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. दुमीपाडा, मांजरपाडा, घोडी, श्रीभुवन, धोंडाळपाडा आदी योजनांच्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. तसेच, त्यांच्या कामकाजाचा आढावा ते घेणार आहेत. त्यामुळे येत्या काळात नदी जोड प्रकल्पांच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
जलसंपदामंत्र्यांचा दौरा असा