मुंबई – जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांनी अखेर शिवबंधन बांधले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता त्यांनी सेनेत प्रवेश केला.