बर्लिन: जगभरात कोरोना साथीच्या आजारावर लसीकरण मोहीम वेगाने सुरू असूनही युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा समस्या वाढत आहेत. विशेषतः ब्रिटनहून जर्मनीमध्ये आलेला कोरोनाचा नवा विषाणू अधिक प्राणघातक आणि वेगवान पसरला असून जर्मन नागरिकांमध्ये हाहाकार उडाला आहे.
जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पेहान म्हणाले की, ब्रिटनमधून आलेला हा विषाणू आता आमच्या देशात अधिक प्राणघातक बनला आहे. नव्याने संक्रमित २२ टक्के रुग्णांमध्ये अशाच प्रकाराचा कोरोना आढळला आहे. या आजारामुळे लोकांचे अधिक नुकसान होत आहे. तर दुसरीकडे ब्रिटनने म्हटले आहे की, व्हॅटिकन सिटीने आपल्या कर्मचार्यांना कोणतीही लस दिली नाही, त्यामुळे प्रत्येकास येथे लसीकरण करणे आवश्यक आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या बर्याच भागात बर्फवृष्टीमुळे कोरोना लसीचे काम रखडले आहे. तर दक्षिणी प्रांत, जॉर्जिया, अलवामा या राज्यांत लस पुरवठा लांबणीवर पडला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांनीही लस येण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली. तीच समस्या इतर भागातही येत आहे. मकामध्ये कोरोनाची लस सुरू केली गेली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचा तीन दशलक्ष मुलांना संसर्ग झाला आहे. तसेच एक लाख मुलांपैकी सरासरी चार हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. नेपाळने चीनच्या सिनोफर्मा कंपनीच्या लसीला मान्यता दिली आहे. यापूर्वी नेपाळने भारताच्या लसीला परवानगी दिली होती. नेपाळला भारताने दहा लाख लसीचे डोस विनामूल्य दिले आहेत. दक्षिण आफ्रिका ही लस भारताकडून घेऊन ती आफ्रिकन देशांना मोफत पुरवणार आहे.