श्रीनगर – कोट्यवधींचे आराध्यस्थान असलेल्या माता वैष्णवदेवीचे मंदिर अखेर पाच महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झाले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे हे मंदिर मार्चपासून बंद होते. दिवसाकाठी हजारो व्यक्ती येथे दर्शन घेतात. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिवसाला केवळ दोन हजार व्यक्तींनाच दर्शनाची परवानगी देण्यात येणार आहे. मी मातेच्या दर्शनासाठी उत्सुक असून अन्य भाविकही येथे दर्शनासाठी येतील, अशी प्रतिक्रीया एका भाविकाने दिली आहे.