नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३ दशकांपासून सीमेपलीकडून आर्थिक पाठबळ आणि सहाय्य मिळणाऱ्या दहशतवादामुळे प्रभावित झाले आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमा/नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या शस्त्रबंदी उल्लंघनाचे वृत्त येत असते. सरकरने दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे. गेल्या तीन वर्षात जम्मू काश्मिरमध्ये युद्धविराम उल्लंघन आणि दहशतवादी हल्ल्यांची माहिती केंद्र सरकारने सादर केली आहे.
युद्धविरामाचे उल्लंघन / सीमापार गोळीबार प्रकरणात सुरक्षा दलाकडून त्वरित व प्रभावी सडेतोड कारवाई केली जाते. सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे मागील तीन वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील मागील ३ वर्षातील युद्धविराम उल्लंघन, दहशतवादी हल्ले तसेच दहशतवादी हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या आणि मृत्यू झालेले सामान्य नागरिक, या हल्ल्यात शहीद झालेले सुरक्षा दलाचे जवान यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. : –
Type of incident | 2018 | 2019 | 2020 | |
Ceasefire violations | Incidents | 2140 | 3479 | 5133 |
Civilian killed | 30 | 18 | 22 | |
Civilians injured | 143 | 127 | 71 | |
Security Personnel martyred | 29 | 19 | 24 | |
Security Personnel injured | 116 | 122 | 126 | |
Terrorist attacks | Incidents | 614 | 594 | 244 |
Civilian killed | 39 | 39 | 37 | |
Civilians injured | 63 | 188 | 112 | |
Security Personnel martyred | 91 | 80 | 62 | |
Security Personnel injured | 238 | 140 | 106 | |
Terrorist killed | 257 | 157 | 221 |