कडक सुरक्षा व्यवस्थेत राज्यातील सर्व २० जिल्ह्यांमध्ये मतमोजणी होत आहे. मतपत्रिकेमुळे मतदानाची मतमोजणी करण्यास वेळ लागत आहे. जिल्हा विकास परिषदेची निवडणूका (डीडीसी ) प्रथमच घेण्यात आल्या. यात भाजप ७४, नॅशनल कॉन्फरन्स ६७, अपक्ष ४९, पीडीपी २७, कॉंग्रेस २६, जेकेएपी १२, जेकेपीसी ८, सीपीआयएम ५, जेकेपीएम ३, जेकेएनपीपी २ जागा जिंकू शकल्या आणि पीडीएफ २ आणि बसपाला एक जागा मिळाली.
दहशतवादाचा भिती आणि मतदान करण्यासाठी काही ठिकाणी उणे सात अंश तपमान असे हवामानाचे मोठे आव्हान होते मात्र मतदारांचा खूप उत्साह असलेल्या या निवडणुकीतील मतदानापासून ते निकालापर्यंत सर्व कामे शांततेत पार पडली. राज्यातील ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जिल्हा विकास परिषदेची निवडणूक यशस्वी करुन मोठा विजय मिळविणार्या भाजपाने लोकांची मते आणि मने जिकंली. येथे त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन केली असून लोकांच्या उत्साहामुळे फुटीरतावाद्यांना निवडणूक बहिष्कार घोषित करण्याचे धैर्य जमले नाही. त्याच वेळी, पंचायती निवडणुकांच्या पहिल्या द्विस्तरीय निवडणुकांवर बहिष्कार घालणार्या काश्मीरमधील पक्षांनी यू-टर्न घेऊन केवळ निवडणुकांमध्येच भाग घेतला नाही तर त्यांचा राजकीय सहभाग दाखविला.