लखनऊ – भारतात काहीही होऊ शकतं, याची प्रचिती देणारी आणखी एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका व्यक्तीने मंदिराची जागा हडपण्यासाठी चक्क देवालाच मृत दाखविण्याचा प्रकार केला.
पहिले तर कागदपत्रांवर या व्यक्तीने भगवान कृष्ण–राम यांना वडील म्हणून दाखविले. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला आणि जमिनीचा मालकी हक्क आपल्याकडे आहे, हे सिद्ध करण्याची त्याची धडपड सुरू झाली.
त्यासाठी आवश्यक बनावट कागदपत्रे त्याने बनविली. या फसवणुकीच्या बाबतीत मंदिराच्या विश्वस्ताने केलेली तक्रार नायब तहसीलदारापर्यंत आणि पुढे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेली. तेथेही न्याय मिळाला नाही म्हणून हे प्रकरण उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर तक्रारकर्ते ट्रस्ट चुकीचे नाही हे सिद्ध झाली.
मोहनलालगंज येथील कुशमोरा हलुवापूर येथील ही घटना आहे. उपमुख्यमंत्री दिनेश शर्माच्या निर्देशांवरून एसडीएमकडे प्रकरण सोपविण्यात आले. संबंधित जागा भगवान कृष्णराम यांच्या नावावर आहे, असे दाखविण्यात आले आहे.
मंदिर 100 वर्ष जुने आहे. ही कालपरवाची घटना नाही तर अनेकवर्षे भगवान कृष्णरामच या जमिनीचे मालक आहे. 1987 मध्ये कृष्णरामला मृतक दाखवून आरोपीने गया प्रसाद नावाचा बनावट बाप कागदपत्रावर तयार केला.
गया प्रसाद हा कृष्णराम यांचा बाप दाखविला. काही दिवसांनी 1991 मध्ये गया प्रसादलाही मृत दाखविले आणि त्याचा भाऊ रामनाथ आणि हरिद्वार यांची बनावट नावे कागदपत्रांवर चढवली. या सर्वांची पहिली तक्रार 2016 मध्ये आली, पण त्याविरोधात कुठलीही कारवाई झाली नाही.
2018 मध्ये तक्रारकर्ते उपमुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत भगवान कृष्णराम या नावाला व्यक्तीच्या रुपात मान्यता देण्यात आल्याचे पुढे आले. या प्रकरणाची चौकशी अद्याप संपलेली नसून आणखी पुढे किती गमतीदार गोष्टी पुढे येतात ते बघण्याची उत्सुकता लागलेली असेल.