नवी दिल्ली – नोएडा येथील बहुराष्ट्रीय आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजनं आपल्या कर्मचाऱ्यांना ७०० कोटी रुपयांहून अधिक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं १० अब्ज डॉलरच्या (७२,९०० कोटी रुपये) महसुलाचं लक्ष्य गाठल्याच्या आनंदात कर्मचार्यांना हा एकवेळचा बोनस देण्यात येणार आहे.
कंपनीततर्फे सोमवारी ही माहिती देण्यात आली. भारतासह इतर देशातील कंपनीच्या कर्मचार्यांना बोनस वाटप याच महिन्यात केलं जाणार आहे. यामध्ये कर्मचार्यांना त्यांच्या १० दिवसांच्या वेतनाबरोबची अधिकची रक्कम दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे कंपनीला १० अब्ज डॉलरचा महसूल प्राप्त झाला आहे. कोरोना महामारीच्या कठिण परिस्थितीतही कर्मचारी कामाप्रति कटिबद्ध आहेत, असं कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे मुख्य अधिकारी अप्पाराव पी. पी. यांनी सांगितलं. बोनस देऊन कंपनीनं कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. याचा लाभ १.५९ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. हा विशेष बोनस कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०२१ मिळेल. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार, एचसीएलचमधील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची संख्या १,५९,६८२ होती.