कोलंबो – श्रीलंका क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा यानं आपल्या देशासाठी इतिहास रचला आहे. थिसारा परेरानं व्यावसायिक क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. क्रिक इन्फोच्या माहितीनुसार, रविवारी पनागोडाच्या लष्करी मैदानावर झालेल्या मेजर क्लब्स अ यादीतील मर्यादित षटकांच्या सामन्यात परेरानं हा विक्रम केला.
थिसारा परेरा १३ चेंडून ५२ धावा करत नाबाद राहिला. सोबतच अ स्तरावरील क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक बनवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. श्रीलंका क्रिकेटनंसुद्धा थिसारा परेराच्या सहा षटकार मारण्याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. कोणत्याही फलंदाजासाठी सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणं अत्यंत कठीण आहे.
थिसारा परेरा श्रीलंका लष्करी संघचं कर्णधारपद भूषवत आहे. परेरा स्पर्धेत ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि अॅथेलेटिक क्लबच्या विरोधात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. त्यानं आपल्या डावात एकूण आठ षटकार मारले. थिसारा परेरानं श्रीलंकेकडून सहा कसोटी, १६६ एकदिवसीय आणि ६४ टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
त्यापूर्वी श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू कौशल्या वीररत्ने यानं २००५ मध्ये १२ चेंडून अर्धशतक फटकावलं होतं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा थरेरा नववा क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्याशिवाय गैरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्शल गिब्स, युवराज सिंह, रॉस व्हाइटली, हजरतुल्लाह जजई, लियो कार्टर आणि किरोन पोलार्ड यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारात एका षटकात षटकार ठोकले आहेत.