मुंबई – राज्यभरातील तरुणांसाठी मोठी खुषखबर आहे. राज्य सरकारने मेगा भरती जाहिर केली आहे. पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० तर पोलिसांच्या ५ हजार २९७ जागांसाठी भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने महापोर्टल रद्द केले असून चार स्वतंत्र कंपन्यांद्वारे ही भरती केली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तरुण भरतीची प्रतिक्षा करीत आहेत. अखेर महाविकास आघाडी सरकारने या सर्वांना दिलासा दिला आहे. महापोर्टल द्वारे राज्यात भरती केली जातत होती. मात्र, त्यास कडाडून विरोध केल्याने सरकारने हे पोर्टल रद्द केले आहे. तसेच, पहिल्याच टप्पात पोलिस आणि आरोग्य विभागातील एकूण १३ हजार ७९७ जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी राज्य सरकारने चार कंपन्यांची निवड केली असून त्यांच्याद्वारेच पुढील सर्व प्रक्रिया राबविली जाणार आहे.
https://twitter.com/satejp/status/1352866839714426880