नागपूर – राज्यामध्ये लवकरच तब्बल १२ हजार ५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ही माहिती दिली आहे. ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत जागा भरल्या जाणार आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविल्यानंतरही जर जागा शिल्लत राहिल्या तर आणखी भरती केली जाईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे पोलिस भरतीकडे आस लावून असलेल्या अनेक युवकांना दिलासा मिळाला आहे.








