नवी दिल्ली – जगभरातील सर्वच देश हे कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहे. अनेक देशांतील परिस्थिती गंभीर झाली असून एकूण रुग्णांची संख्या ही सुमारे ११ कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र जिब्राल्टर या छोट्याशा देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मिळाली असून लसीकरण संपूर्ण करणारा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
जगातील अनेक देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली आहे. लसीकरण पूर्ण करणारा जिब्राल्टर हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. या देशात सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचा डोस देण्यात आला आहे.
जिब्राल्टरची लोकसंख्या सुमारे ३३ हजार आहे. या ठिकाणी कोरोनाचे ४ हजार २६३ रुग्ण आढळून आले होते. तर देशातील ९४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. जिब्राल्टरचे प्रमुख फॅबियन पिकार्डो यांनी लसीकरणासाठी ब्रिटन सरकारचे आभार मानले असून पीपीई कीट, लसी आणि चाचण्यांसाठी लागणारी सर्व आर्थिक मदत ब्रिटनने आम्हाला केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं पिकार्डो म्हणाले.