नवी दिल्ली – चित्रपट इंडस्ट्रीतील सुपरस्टार आणि लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या रजनीकांतने अखेर मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी रजनीकांत नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे. तसेच, जानेवारीत हा पक्ष सक्रीय होणार आहे. तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांतने ही घोषणा केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो राजकारणात येणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्याची दखल घेत सुपरस्टारने आता राजकीय प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या घोषणेमुळे दक्षिण भारतात उत्साहाचे वातावरण असून त्याच्या चाहत्यांकडून सोशल मिडियात त्याचे उत्स्फुर्त स्वागत केले जात आहे.