आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून विकासकामे लागणार मार्गी
घोटी – वार्षिक योजनेतून जनसुविधा विकास योजनेंतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतून दशक्रिया विधी शेड,स्मशानभूमी बांधकामे व अनुषंगिक कामांची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे होत आहे. ही मागणी ओळखून अशा कामांसाठी भरीव निधी दिला तरच कामे चांगली होतील,या अनुषंगाने आमदार कोकाटे यांनी मतदार संघातील गावांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधा विकास योजनेंतर्गत विकास कामांची मागणी केली होती.त्यानुसार १ कोटी ९० लाख रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहे.यासाठी पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे सहकार्य लाभले.ग्रामीण भागासाठी मंजूर झालेल्या या कामांमुळे संबंधित गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्मशानभूमीतील कामासाठी प्रथमच मिळाले १५ लाख रुपये..
आतापर्यंत स्मशानभूमी अथवा दशक्रिया विधी शेड अथवा अनुषंगिक कामासाठी सरासरी ५ लाख रुपये मिळत असे.मात्र ही रक्कम अपुरी असल्याने कोणतेही काम व्यवस्थित होऊ शकत नसल्याची जाणीव आमदार कोकाटे यांना असल्याने त्यांनी पुरेसा निधी एका कामासाठी मिळायला पाहिजे,ही गोष्ट हेरून निधीची मागणी केली.त्यानुसार सोनगिरी येथे स्मशानभूमीत बैठक व्यवस्था निर्माण करण्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला.अशा कामांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे.रामपूर व खडांगळी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी प्रत्येकी ७.५ लाख रुपये,गंभीरवाडी ८ लाख तर धामणी येथे १२ लाख रुपये मंजूर झाले आहेत.कोनांबे,पिंपळे व लोणारवाडी या गावांना स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी मिळाला आहे.चास येथे दशक्रिया विधी परिसर सुधारणा करणे साठी १० लाख व कब्रस्थानमधील परिसर सुधारणा करण्यासाठी १० लाख रुपये निधी मिळाला आहे.मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा विकास योजनेंतर्गत मुसळगाव व नायगाव या गावांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
सुविधांयुक्त बांधली जाणार ग्रामपंचायत कार्यालये…
गावचा कारभार चालवितांना अनेक गावकारभाऱ्यांना बसायलाही नीट जागा नसते.ग्रामपंचायतीत कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांनाही थांबण्यास जागा नसते.त्यामुळे नवीन ग्रामपंचायत कार्यालये ही सुविधांयुक्त असावी ही बाब हेरून आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाच ग्रामपंचायत कार्यालयांसाठी ९० लाख रुपये निधी मंजूर करून आणला.कवडदरा,वासळी, विंचूरदळवी व शिवडे या चार गावांत प्रत्येकी २० लाख रुपयांची स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालये मंजूर झाली आहेत.तर दापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात अनुषंगिक कामे करण्यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.