शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जनकल्याण गोशाळेचा उद्घाटनानिमित्त – ८० वर्षांच्या तरुण गोसेवकाची जिद्द !

by Gautam Sancheti
जानेवारी 31, 2021 | 7:00 am
in इतर
0
images 2021 01 29T193643.551

संजय देवधर, नाशिक 
….
 गोविज्ञान सेवाभावी संस्था संचलित जनकल्याण गोशाळेचा उद्घाटन समारंभ बुधवारी ( दि.३) होत आहे. सुरगाणा तालुक्यातील भिंतीघर – गुलाबी गाव येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदाचार्य अजित रावळ उपस्थित राहणार आहेत. येथे अवघ्या पाच महिन्यात गोशाळेची उभारणी झाली.हे काम करणारे व गोसेवेचे व्रत अंगिकारलेले ८० वर्षांचे सेवाव्रती कुबेर पोपटी यांच्याशी यानिमित्ताने झालेला हा संवाद…
20210127 170652 scaled
   एक कार्य उभे राहून स्वयंपूर्ण झाल्यावर तेथे थांबू नये ही प्रेरणा दासबोधातून मिळाली. एका जागी स्थिर झाल्यावर आसक्ती निर्माण होते. म्हणून आधीच्या कार्याची धुरा सक्षम हातांमध्ये सोपविली. सामाजिक कामातून मिळालेल्या ऊर्जेचा स्रोत मला भिंतघर येथे घेऊन आला. असे सांगून कुबेर पोपटी पुढे म्हणाले, नाशिकच्या शंकराचार्य न्यास संचलित मोरोपंत पिंगळे गोशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी पूर्वी आलो होतो.त्याकाळात  वनवासी भागात तळमळीने सेवाकार्य करणाऱ्या भीमराव गारे यांच्याशी संपर्क आला होता. त्यांच्याच पुढाकाराने आदिवासी सुरगाणा परिसरात पाच जागांची पाहणी केली. प्रतापगड भागात जवळ पाणी उपलब्ध असणारी २२ एकर जमीन मिळत होती.पण तेथे सर्वच तयार असल्यावर आपण काय निर्माण करणार हा प्रश्न पडला.म्हणूनच ‘ नाही रे ‘ चे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिंतघर – गुलाबी गाव येथेच गोशाळा उभी करण्याचा संकल्प केला.रघुनाथ परशुराम जाधव यांनी २ एकर जागा दान केली. लॉकडाऊनमध्ये केवळ ५ महिन्यात कै. काळू धर्मा जाधव यांच्या स्मरणार्थ गोशाळा सर्वांच्या सहकार्याने उभी राहिली. स्वप्नपूर्ती झाली आहे. लवकरच ती स्वयंपूर्ण देखील होईल. असा आत्मविश्वास पोपटी यांनी व्यक्त केला.
   हल्ली आपण आसपास बघतो की, बरेचजण वयाच्या पन्नाशीतच थकलो बुवा हे रडगाणे गातात. सेवानिवृत्तीनंतर फक्त आराम व मौजमजेत वेळ घालवणारे अवतीभवती दिसतात. या पार्श्वभूमीवर ८० वर्षांच्या तरुण गोसेवक कुबेर तुकाराम पोपटी यांचे सेवाकार्य तरुणाला लाजवेल असेच आहे. मेकॅनिकल इंजिनिअर ते गोपालक असा त्यांचा
जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. मूळचे कर्नाटकातील इरकल गावचे पोपटी यांचे शिक्षण गुजरातमधील अहमदाबाद येथे झाले.रोजगारानिमित्त महाराष्ट्रात आले. मुंबईत ६ वर्षे नोकरी करून ते पुण्यात कोथरूडला स्थायिक झाले. वनाझ इंजिनिअरिंग कंपनीत १९ वर्षे नोकरी केली. विद्यार्थीदशेत असताना पानशेत धरण फुटले तेव्हा माहितीही नसलेल्या पुण्यात येऊन त्यांनी व मित्रांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.१९८५ साली त्यांनी नोकरी सोडून वारजे- शिवणे भागात स्वतःचा डायमेकिंगचा कारखाना सुरु केला. २००० साली मुलाचे लग्न होऊन सर्व स्थिरस्थावर झाल्यावर कारखान्याची पूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली. २००५ साली हरिद्वार येथे जाऊन बाबा रामदेव यांच्याकडून ते योगविद्या शिकले. पुढच्याच वर्षी योगशिक्षक प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला.२००७ साली पत्नी कलावती यांच्यासमवेत पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करताना आदिवासी बांधवांचा सेवाभाव, आदरातिथ्य जवळून अनुभवले. ते बघून समाजसेवेचा अभिमान गळून पडला. असे पोपटी यांनी प्रांजळपणे नमूद केले.
   लहानपणी सातवीत शिकत असताना मामांकडे पोपटी यांची खा. जगन्नाथराव जोशी यांची भेट झाली. त्यांनी संघविचार पेरले. तेथूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी आणि संघपरिवाराशी जोडला गेलो असे सांगून पोपटी पुढे म्हणाले, निवृत्तीनंतर मी व पत्नीने उर्वरीत जीवन गोसेवेला समर्पित करण्याचे ठरवले. २००८ साली पुण्याच्या मार्केटयार्डजवळ गोविज्ञान संशोधन संस्थेत दाखल झालो. संस्थाचालक राजेंद्र लुंकड,बापूसाहेब कुलकर्णी तेथे महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातल्या गोशाळेतून उत्पादने आणून त्यांची विक्री करीत. त्यांनीच प्रोत्साहन देऊन नागपूरजवळ देवलापूर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. तेथे आयुर्वेदाचार्य नंदिनी भोज यांनी ७ दिवसांत गोमूत्र, शेण यांचा वापर करून १५ उत्पादने करण्यास शिकवले. त्यांचे फॉर्म्युला दिले. पुण्यात कोथरूडला घरी परतल्यावर छोट्या प्रमाणात दंतमंजन, गुढगेदुखी थांबवण्यासाठी मालिशतेल तसेच धुपकांडी, साबण तयार केले. लोकांना पसंत पडले, औषधांनी रुग्णांना गुण आला. नंतर अनेक गोशाळांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. अभ्यास केला. १५ गायींची गोशाळा उभारण्याचे निश्चित केले. जागेचा शोध घेत असतांना सीताराम कोंडाळकर या मित्राने लवासाजवळ १ एकर जागा दिली. स्नेही एच.पी.जोशी यांनी ५ गायी व १ वासरू आणून दिले. श्रीमती गऊबाई श्रीपती कोंडाळकर स्मृती गोशाळेला प्रारंभ केला. मातोश्री सेवा व अनुसंधान ट्रस्टची ही गोशाळा दोन वर्षात स्वयंपूर्ण झाली. पंचगव्यावर आधारित ३२ उत्पादने सुरु केली. त्यातील १५ पोटात घेण्याची औषधे असल्याने परवान्यांचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा डॉ. अजित रावळ यांनी मदत केली. निर्माते म्हणून त्यांचे नाव वापरण्याची परवानगी मिळाली.
   आता जनकल्याण गोशाळेत औषध व उत्पादनांची निर्मिती होते. परिसरातील महिला बचतगटातील ११ जणींंना प्रशिक्षण दिले. त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्याने त्यांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास सुरु झाला आहे. ५ पगारी स्त्रीपुरुष येथे काम करतात.तसेच गोठ्याची कामे करण्यासाठी एक कुटुंब रहाते. वर्षभरात ही गोशाळा स्वयंपूर्ण होईल असा आत्मविश्वास पोपटी यांनी व्यक्त केला. गोशाळेच्या माध्यमातून परिसरातील शेतांमध्ये विविध प्रयोग सुरू आहेत. सेंद्रिय शेतीसाठी शेण, गोमूत्र यांचा वापर वाढला आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमीन खराब होते हे शेतकऱ्यांना पटतेय. शेतमालाचे उत्पन्न थोडे कमी आले तरी गुणवत्ता चांगली होते हे टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना कळले आहे. त्यांचे बघून नव्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे आकर्षित होत आहेत. असे सांगून पोपटी म्हणाले, कोरोनामुळे भावनिक शक्ती तर गायींंपासून नैतिक बळ मिळाले. ५ वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. मात्र आम्ही दोघांनी ठरवलेले ध्येय गाठताना समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिद्दीने उभा राहिलेला हा प्रकल्प परिसरातील आदिवासींच्या जीवनात विकासाचे नवनवे प्रकाशझोत आणेल. त्यांना आत्मनिर्भर करेल. त्यामुळे त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही असा दृढनिश्चय पोपटी यांच्या चेहऱ्यावर तरळत होता.
गोशाळेच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास
    गोशाळेचे प्रकल्पप्रमुख भीमराव गारे म्हणाले,गोमातेची सेवा व गोशाळेच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी वस्तीत चांगले काम उभे राहील ही खात्री होती. सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांशी, वस्त्यांमध्ये माझी तसेच संघविचारांची नाळ जुळलेली आहे. पाच वर्षांपूर्वी कुबेर पोपटी यांच्याशी संपर्क झाला. त्यातून या प्रकल्पाला चालना मिळाली. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असतांना पोपटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बघता बघता गोशाळेची उभारणी केली. आदिवासी बांधवांची संपूर्ण साथ मिळाली.  अनेक ज्ञात- अज्ञात हातांनी श्रमशक्ती व अर्थशक्तीचा समन्वय साधला. शाश्वत विकासाचा पहिला टप्पा गाठला आहे. साबरदऱ्याचे कार्यकर्ते महादू भोये,हिरामण देशमुख, भिका जाधव, बिवळ गावचे विनायक कापडी,कृष्णा भोये, शिवराम बागूल, धामणकुंड गावातील मोतीराम भोये ही केवळ प्रातिनिधिक नावे. अशा अगणित कार्यकर्त्यांनी तन, मन, धनाचे बळ दिले. गोविज्ञान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाठक, उपाध्यक्ष नरहर जोशी, सचिव सुनील काण्णव  तसेच सदस्य योगिनी चंद्रात्रे, रविंद्र करंबेळकर, रघुनाथ जाधव, जयंत गायधनी व अनेकांचे सहकार्य लाभले आहे.
महिला सबलीकरणाचा अनोखा संदेश !
   सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव हा राज्यातील आगळावेगळा प्रयोग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचे, सौहार्दाचे, परस्परातील सलोख्याचे प्रतीक आहेच. मात्र या आदिवासी  गावाने महिला सक्षमीकरण, सबलीकरण यांचा अनोखा संदेश दिला आहे. ९० घरांची वस्ती असणाऱ्या या गावासह पाच गावांची मिळून ग्रामपंचायत आहे. येथील शिक्षक जितेंद्र गवळी यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व घरे गुलाबी रंगात रंगलेली आहेत.संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून योजना राबवली. गावात प्लास्टिक बंदी असून स्वच्छता वाखाणण्याजोगी दिसते. कचरा संकलन करून सेंद्रिय
खतनिर्मिती करण्यात येते. येथील समाजमंदिर व सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे स्वागतासाठी सज्ज झालेल्या गुलाबी गावाला नवी झळाळी आली आहे. बचतगटाच्या महिला व पुरुष पारंपरिक तारपा नृत्य सादर करणार आहेत. या गावाला चांगली ओळख मिळाली आहे. पर्यटकांनाही येथे येण्याची उत्सुकता असते. पण अद्याप बस देखील पोहोचत नसल्याने अडचणी येतात.ती अडचण दूर व्हावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त आहे.
संजय देवधर – मो-९४२२२७२७५५
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेच्या हळदी – कुंकूच्या कार्यक्रमात केतकीची धमाल

Next Post

नाशिक – अंबड एमआयडीसी मधील एका खेळणी बनवण्याच्या कंपनीला आग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210131 WA0015

नाशिक - अंबड एमआयडीसी मधील एका खेळणी बनवण्याच्या कंपनीला आग

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011