नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर के.के.वाघ कॉलेज ते कोणार्क नगर उड्डाणपूलाचे काम प्रगती पथावर आहे. पण या ठिकाणी सर्व्हिस रोडवर डिव्हायडर टाकू नये शिवाय सर्व्हिस रोडसाठी वाढीव जागा घेतल्यास व्यवसायाचे नुकसान होईल त्यामुळे उपजीविकेचे साधन नष्ट होण्याची भीती निर्माण होणार असल्यामुळे सर्व्हिस जास्त वाढवू नये अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्याकडे परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी या जत्रा हॉटेल ते आडगाव परिसरातील व्यासायिक, ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने महामार्ग प्राधिकरणाचे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी विनोद काठे, हरविंदर सिद्धू, सुरेश कापरे यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावर उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्यात आहे. यापूर्वी देखील रस्त्याच्या कामामुळे व्यवसाय अडचणीत होते. आत्ता देखील काम सुरु असल्यामुळे व कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यवसाय अडचणीत आहे. आता अजून सर्व्हिस रोड वाढवल्यास उपजीविकेचे साधन नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढीव जागा घेऊ नये, सर्व्हिस रोडवर डिव्हायडर टाकू नये अशा विविध मागण्यांचा विचार करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.