मनाली (हिमाचल प्रदेश) – जगातील सर्वात लांबीच्या बोगद्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या बोगद्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. मनाली ते लेह महामार्गावर हा बोगदा आहे. तो तब्बल ९.२ किमी लांबीचा आहे. समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवर हा बोगदा असून त्यातून दररोज ३ हजार कार आणि दीड हजार ट्रक वाहतूक करू शकतील. संरक्षणाच्या दृष्टीने या बोगद्याचे मोठे महत्त्व आहे. लष्कराला विविध सामुग्री सीमेवर पाठविण्यास या बोगद्याचा फायदा होणार आहे. संरक्षण विभागाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने हा बोगदा तयार केला आहे.
असा आहे बोगदा (बघा व्हिडिओ)