मुंबई – संयुक्त अरब अमिरातमध्ये राहणाऱ्या एका भारतीय प्रवाश्याने ८.२ वर्ग मीटरचे भव्य पॉप-अप ग्रीटींग कार्ड तयार केले आहे. या कार्डच्या माध्यमातून त्यांनी गिनेस बुक आफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १९ व्या वेळी नाव नोंदविले आहे.
त्यांनी युएईचे पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बीन राशिद मकतूम यांना पदभार स्वीकारून १५ वर्षे झाल्यानिमित्त हे ग्रीटींग कार्ड बनविले आहे. दुबई निवासी रामकुमार सारंगपानी आता युएई आणि भारतात एकाच व्यक्तीने सर्वाधिक विक्रम नोंदविणारे ठरले आहेत. त्यांचे पॉप-अप ग्रिटींग कार्ड नियमीत पॉप-अप ग्रिटींग कार्डपेक्षा १०० पटींनी मोठे आहे. यात कलावंत अकबर साहेब यांनी काढलेल्या शेख मोहम्मद यांच्या चित्रांचा कोलाज आहे. शेख मोहम्मद यांना समर्पित या कार्डचे क्षेत्रफळ ९.२० चौरस मीटर आहे. यापूर्वीचा रेकॉर्ड हाँगकाँगच्या नावावर होता. त्यांचे पॉप-अप ग्रिटिंग कार्ड ६.७२९ चौरस मीटर होते. गेल्या सहा महिन्यांपासून सारंगपानी या कामात लागले होते, हे विशेष.
असे बनवतात पॉप-अप कार्ड
पॉप-अप कार्ड किंवा थ्रीडी ग्रिटींग कार्ड कोणत्याही सामान्य कार्डला शानदार बनविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सजावटीच्या कागदांच्या माध्यमातून एक पट्टी तयार करा. त्यानंतर पट्टीवर पॉप-अप प्रतिमा ठेवायची. बाहेरून आणलेल्या कार्डवर हे करायचे असेल तर फक्त पॉप-अप इमेज मध्यभागी ठेवायची आहे.