नवी दिल्ली – जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. याचा जोरदार फटका जगातील टॉप टेन श्रीमंतांना बसला आहे. दिवसाला ३४ अब्ज डॉलर्सचे नुकसान यामुळे झाले आहे. तसेच, फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीमध्ये जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या बिल गेट्स एक स्थान खाली घसरले आहे. त्यांची जागा बर्नार्ड अर्नोट अँड फॅमिलीने घेतली आहे. बिलगेट्स सध्या तिसर्या क्रमांकावर आहेत. या काळात भारतातील सर्वांत श्रीमंत मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास एक अब्ज डॉलर्सने घटली आहे. बुधवारी अमेरिकेचा शेअर बाजार ३.५ टक्क्यांपेक्षा कमी घसरला आहे. डाऊ जोंस ९४३ने घसरून २६५१९ला क्रॅश झाला. तर दुसरीकडे, नॅस्डॅकनमध्ये ४२६ची घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. एसएन्डपी ११९ने घसरला आहे. फेसबुकचे शेअर्स साडेपाच टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत.