पॅरिस – आपल्या साधेपणामुळे ओळखले जाणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आता त्यांच्या नम्रतेमुळे जगभरात चर्चेत आले आहेत. स्लोव्हाकिया देशाचे पंतप्रधान इगारे मातोव्हिक फ्रान्समध्ये दाखल झाले. त्याचवेळी पाऊस सुरू झाला आणि त्यांना पावसापासून वाचविण्यासाठी मॅक्रॉन यांनी छत्री धरली. ही बाब जगभरातील मिडियात विशेषत्वाने चर्चिली जात आहे.
पॅरिसमधील रिसिडन्स हाऊसलिझी पॅलेसमध्ये स्लोव्हाकिया पंतप्रधान स्वागतावेळी पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी अचानक पाऊस आल्याने पंतप्रधानांना पावसापासून वाचवण्यासाठी जवळ उभे असलेले फ्रेंच राष्ट्रपतींनी ताबडतोब त्यांच्या डोक्यावर छत्री धरली.
वास्तविक यावेळी महिला सहकार्यांनी तीन वेळा मॅक्रॉनकडून छत्री घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी नकार दिला. मॅक्रॉन यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडियावर त्यांचे खुले कौतुक होत आहे. तसेच केवळ फ्रान्समधील नव्हे तर जगभरातील लोक म्हणतात की, एका देशातील प्रमुखाबद्दल नम्रतेचे असे उदाहरण क्वचितच पाहिले जाईल. कित्येक वेळा, कडक प्रोटोकॉलमुळे, राजकारणी तसे करण्यास असमर्थ असतात, कारण ते देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
French President Emmanuel Macron holds umbrella for Slovak leader https://t.co/POxmfvFgVa pic.twitter.com/Bb2QekImON
— Reuters (@Reuters) February 3, 2021