नवी दिल्ली – कोट्यवधी चाहत्यांचे आणि अतिशय लोकप्रिय असलेले युट्यूब हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म ,जीमेल, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले या सेवा अचानक डाऊन झाल्या. त्यामुळे कोट्यवधी नेटकऱ्यांना त्याचा फटका बसला. तब्बल ४५ मिनिटांनंतर या सेवा पुन्हा सुरू झाल्या. यासंदर्भात गुगलकडून अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, नेटकऱ्यांनी या सेवांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सोशल मिडियावर गुगलला लक्ष्य केले. अनेकांनी खोचक टिपण्णी केली आहे. सेवा खंडित झाल्याने पुन्हा एकदा गुगलला ट्रोल केले गेले.