वॉशिंग्टन – जगभरात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. जगभरात कोरोना संक्रमणाची १२ कोटी १७ लाख ही संख्या ओलांडली आहे. त्याचवेळी, संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या सुमारे २६ लाखांपेक्षा जास्त आहे.
यापैकी काही देशांची स्थिती अशी आहे….
ब्राझिलमधील परिस्थिती अत्यंत वाईट
गेल्या २४ तासांत संक्रमणामुळे २७२४ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ब्राझीलमध्ये, ८६ हजार ९८२ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. ब्राझीलमध्ये एका दिवसात ९० हजार ३०३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर संक्रमणामुळे २ हजार ६४८ लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी आतापर्यंत ब्राझीलमध्ये एक कोटी १७ लाख ८० हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर २ लाख ८७ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
फ्रान्समध्ये परत लॉकडाउन
फ्रान्सने राजधानी पॅरिससह अन्य प्रांतांमध्ये महिनाभरासाठी मर्यादित लॉकडाऊन जाहीर केले आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी सांगितले की, पॅरिससह देशातील १६ प्रदेशात महिन्याभराचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या भागात कोरोनाचे संकट दिसून येत आहे. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाची ३४ हजार ९९८ नवीन घटना घडली आहेत. यासह, देशात कोरोना संक्रमणाचे प्रमाण ४१ लाख ८१ हजार ६०७ पर्यंत वाढले आहे.
पाकिस्तानमध्येही परिस्थिती बिघडली
पाकिस्तानमध्येही कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी बाजारपेठ, शॉपिंग मॉल्स, कार्यालये आणि रेस्टॉरंट्स केवळ अन्नधान्य, औषधी, मांस आणि दुधाची दुकाने खुली असतील. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चिनमध्ये उत्पादन केलेली कोविड लस घेतली. एवढेच नव्हे तर लोकांना नियमांचे पालन करण्याची विनंतीही त्यांनी केली.
अमेरिकेत ५ लाख ३९ हजाराहून अधिक मृत्यू
अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, जगातील १९२ देशांमध्ये कोरोना संसर्ग होण्याची एकूण संख्या १२ कोटी १८ लाख ४ हजारांहून अधिक झाली आहे. आतापर्यंत जगभरात २६ लाख ९१ हजार लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. अमेरिकेत संक्रमित लोकांची संख्या २ कोटी ९६ लाख पेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ लाख ३९ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.