दिंडोरी – तालुक्यातील जऊळके वणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंचपदी योगेश दवंगे तर उपसरपंचपदी सौ उज्वला दवंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागा बिनविरोध झाल्या होत्या. आज सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी राजेंद्र विधाते व तलाठी कांडे डेकर यांच्या उपस्थित निवडणूक झाली. सरपंचपदासाठी योगेश दवंगे यांचा तर उपसरपंच पदासाठी सौ उज्वला शंकर दवंगे यांचा एकच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, शिवसेना नाशिक जिल्हा सुनील पाटील, जऊळके वणी सोसायटीचे चेअरमन भास्करराव पाटील, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव दवंगे, संपत दवंगे, सुदाम दवंगे, सतीश पाटील, बापूराव दवंगे, जगन दवंगे, संतोष दवंगे, योगेश दवंगे, बंडू दवंगे, राजेंद्र पाटील, किरण पाटील, सचिन दवंगे, अशोक दवंगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.