मुंबई – छोटा राजन उर्फ अंडरवर्ल्ड डॉन राजन निकाळजे याला खंडणीच्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळेच त्याला २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१५ मध्ये छोटा राजनने पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदू वजेकर यांच्याकडे तब्बल २६ कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले. या खटल्याची सुनावणी आज झाली. त्यात न्यायालयाने छोटा राजनसह त्याचे साथीदार सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम (दाद्या) आणि सुमित म्हात्रे यांनाही २ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.