चांदोरी – शेतकरी विरोधी कायद्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या वतीने देशभर चक्का जाम करण्याची हाक देण्यात आली होती. चांदोरी येथेही या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी व हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेना व किसान सभेतर्फे चक्काजाम आंदोलन चांदोरी चौफुली येथे करण्यात आले. हे आंदोलन छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, शिवाजी राजे मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सकाळी १० वा च्या सुमारास चांदोरी चौफुली,ता.निफाड,औरंगाबाद महामार्ग येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत असल्याचे सांगत या आंदोलनात सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या सहभागी झाले. महिला आणि वारकरी संप्रदायने भजन करून शेतकरी आंदोलनात भागीदारी केली. आंदोलना मध्ये नरेंद्र मोद…किसान विरोधी….शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दिल्ली के किसान के सन्मान मे हम उतरे मैदान मे या घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात करण गायकर,राजू देसले,शिवाजी मोरे,शिवा तेलंग,उमेश शिंदे, संतोष माळोदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, वंदना कोल्हे, जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, आशिष हिरे,किरण बोरसे,उत्तम कापसे,अविनाश गायकर,मनोहर मुसळे,सागर पवार,सुषमा बोरसे,निफाड तालुका अध्यक्ष सतीश नवले, सागर शेजवळ,योगेश पाटील, कुंदन हिरे,अनील भोर, देवराम आप्पा निकम, बाबा खालकर,गाडे सर,अनिल गडाख, रोशन टरले,आकाश टरले,सचिन हाडोळे, ओमकार टरले, विकास गुळवे,ओमकार झेंडफळे,प्रवीण घोडे,दीपक इकडे,चेतन महाराज नागरे,अभि टरले, प्रज्वल शेटे,प्रकाश गडाख अभिषेक शिंदे , आकाश हिरे, भीमाची गडाख,भास्करराव गायके, किसान सभेचे शिवराम रसाळ, शिवाजी मोगल, भाऊसाहेब शिंदे, शिंदे शिवाजी, जाधव विष्णू, लक्ष्मण काळे, प्रकाश जाधव, आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.